Breaking News

इन्स्टाग्रामवर विराटने गाठला पाच कोटींचा फॉलोअर्सचा टप्पा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अ‍ॅपवरील फॉलोअर्सची संख्या पाच कोटी इतकी झाली आहे. इन्स्टाग्रामवर एवढा मोठा टप्पा गाठणारा विराट हा पहिला भारतीय ठरला आहे.

क्रिकेटच्या मैदानावर सामन्यागणिक विक्रम करणार्‍या विराटने आता सोशल मीडियावरही सर्वोच्चस्थान मिळवले आहे. विराटच्या फॉलोअर्सची संख्या इतकी आहे की त्याच्या आसपासदेखील कोणी नाही.इन्स्टाग्रामवर असलेल्या अधिकृत अकाऊंटपैकी सेलिब्रिटींमध्ये पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे 20 कोटी (200 मिलियन) फॉलोअर्स आहेत.

Check Also

वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!

वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …

Leave a Reply