नवी मुंबई : बातमीदार
प्रभाग क्रमांक 95 मधील नेरुळ गाव येथील मुख्य रस्त्यांचे थिन व्हाईट टॅपिंग पद्धतीने काँक्रिटीकरण होणार आहे. यासाठी भाजपचे नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी नेरुळ गावचे माजी सरपंच के. एन. म्हात्रे, दामोदर म्हात्रे, अनंत म्हात्रे गुरुजी, रत्नाकर पाटील, नारायण पाटील, कुमार पाटील, गणपत बुवा भोपी, देवनाथ म्हात्रे, अक्षय पाटील, शेखर भोपी, रमेश ठाकूर, बाबू म्हात्रे, विकास ठाकूर, विनोद म्हात्रे, कचदेव ठाकूर आदी उपस्थित होते.