उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील जसखार गावातील भाजप जेष्ठ नेते शिक्षण प्रेमी पी. जे. पाटील यांचा 76वा वाढदिवस मोठ्या उत्साहात बुधवारी (दि. 26) जसखार येथे साजरा करण्यात आला. या वेळी कामगार नेते, जेएनपीटी विश्वस्त दिनेश पाटील, कामगार नेते तथा भाजप रायगड (उत्तर) ट्रान्सपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष सुधीर घरत, भाजप रायगड जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस संगिता प्रशांत पाटील, ऐश्वर्या थिएटरचे निर्माते राजेश पाटील, प्रशांत पाटील, कांचन राजेश पाटील, आर्यन प्रशांत पाटील, शैलजा सुधीर पाटील, ऐश्वर्या प्रशांत पाटील, पाटील कुटुंबीय, कामगार नेते सुरेश पाटील, उद्योगपती विकास नाईक, जसखार ग्रामपंचायत सरपंच दामुशेठ घरत, भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी, पदाधिकारी, उरण तालुक्यातील गाव सरपंच, रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागातील पदाधिकारी, मुख्याध्यापक, प्राध्यापक, नाविक सेना राज्य चिटणीस (मनसे) तथा वीर वाजेकर सामाजिक संस्था अध्यक्ष मंगेश वाजेकर, पत्रकार दिनेश पवार, मित्र परिवार आदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.