
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथी, जागतिक मराठी गौरव दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन आणि स्व. जनार्दन भगत यांची 92वी जयंती हे चारही दिवस एकत्रितपणे साजरे करण्यात आले. या वेळी विद्यावर्धिनी अॅकॅडमीच्या संचालिका वरदा जोशी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या वेळी विद्यार्थ्यांनी चार वेगवेगळ्या नाट्यछटा सादर केल्या. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे व साहित्यिकांची भित्तीपत्रके यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांना स्वातंत्रयवीर सावरकरांच्या अतुलनीय कार्याची जाणीव व्हावी तसेच भाषेची गोडी लागावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा अशा उद्देशाने हे चारही दिन आम्ही एकत्रितपणे साजरे केले, असे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. या वेळी विद्यालयाच्या उज्वला कोट्टीयन, निरजा मॅडम, प्रगती जाधव यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.