Breaking News

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

आरोपीविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील वडखळ येथील अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी वाजे (ता. पनवेल) येथील आरोपीविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सदर पीडित मुलीबरोबर ऑक्टोबर 2019मध्ये  फेसबुकद्वारे बोलून तिच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर तिला वडखळ येथे बोलावून घेतले आणि पनवेल येथील फार्महाउसवर नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला अलिबाग वरसोली येथील एका हॉटेलमध्ये रात्रभर वस्तीला ठेवून तिच्यावर जबरदस्ती केली. त्या वेळी काढलेले फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान पनवेल, माथेरान येथे तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तिच्यावर संशय घेऊन तिच्याशी बोलणे बंद केले. 23 फेब्रुवारी रोजी आरोपीने पीडित मुलीला फोन करून पेण रेल्वेस्टेशनवर बोलाविले व तू माझा विषय सोडून दे, नाहीतर तुझे फोटो फेसबुकवर टाकेन, अशी धमकी दिली. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून  अधिक तपास सहाय्य्क पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.

Check Also

पनवेल, उरणमधील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मार्गी लावणार

महाप्रबंधक धरमवीर मीना यांचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल, उरणमधील रेल्वेशी संबंधित समस्या 31 …

Leave a Reply