Breaking News

खारघर शहरात एकाच जागेवर 32 प्रकारची पिके

कोकण कृषी विकास प्रतिष्ठाणचा अनोखा प्रयोग
खारघर ः रामप्रहर वृत्त
खारघर शहराची ओळख म्हणजे सिमेंटचे जंगल. सिडकोने या ठिकाणी शहराची उभारणी केली. शहरातील विविध प्रकल्प शहराच्या सौंदर्यात नेहमी भर घालत असतात. याच शहरात उत्सव चौक परिसरात कोकण कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून तब्बल 32 प्रकारची पिके घेऊन शहरात नंदनवन उभे केले आहे.
कृषी अभ्यासक शेखर सावंत प्रतिष्ठानमार्फत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून राबवत असतात. खारघरमध्ये तब्बल 32 विविध प्रकारची पिके शेखर सावंत यांच्या पुढाकाराने घेतली आहेत. यामध्ये नाशिकचे द्राक्ष, वेगवेगळ्या प्रकारचे भुईमुग, कोकणचा आंबा, वांगी, टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, वाल, गवार, पाण्यातील कमळ, दुधी, पेरू, जाम आदींसह वेगवगेळ्या प्रकारची फुले आणि फळझाडे आपणास याठिकाणी पहावयास मिळत आहेत. येथील संशोधन प्रमुख श्रीकृष्ण सावंत, कृषी अधिकारी काजल देशमुख, उमेश दळवी, विराज सावंत, शुभांगी हरड व इतर कर्मचारी अशी 20 जणांची टीम कार्यान्वित आहे. पिकांना लागणारे गांडूळ खताची निर्मिती येथील केंद्रातच केली जाते. विशेष म्हणजे कृषी विषयक अभ्यासासाठी याठिकाणी मोफत वाचनालय देखील सावंत यांनी उभारले आहे.कृषी अभ्यासक अथवा कृषी विषयक माहितीसाठी कृषी विषयक पुस्तकांचे मोफत वाचन याठिकाणी करता येईल. शेतीविषयी आवड असणारे नागरिक या वाचनालयाला भेट देऊ शकतात.

सध्याच्या घडीला शेतकरी शेतीपासून दुरावत चालला आहे.खारघर सारख्या ठिकाणी आम्ही विविध पिकांचे यशस्वी प्रयोग राबवत असून पनवेलसह इतर ठिकाणी शेतकर्‍यांना आपल्या शेतीत विविध प्रकारची पिके घेता येईल. कृषीविषयक मार्गदर्शन अथवा माहितीसाठी शेतकर्‍यांना आमच्या प्रतिष्ठाणच्या माध्यमातुन सदैव मार्गदर्शन करण्यास आम्ही तयार आहोत.शेतकर्‍यांनी खारघर येथील कोकण कृषी विकास प्रतिष्ठाण केंद्राला आवर्जुन भेट द्यावी.
-शेखर सावंत, कोकण कृषी विकास प्रतिष्ठान, खारघर

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply