Breaking News

रेखा जरे हत्येचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे अटकेत

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होती. अखेर शनिवारी (दि. 13) पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या आहेत.

रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेच्या हालचालींवर पाच दिवसांपासून पोलिसांची सहा पथके लक्ष ठेवून होती. महत्त्वाचे म्हणजे पोलिसांना माहिती होऊन नये म्हणून हॉटेलमधील रुमचा दरवाजा बाहेरून बंद करण्यात आला होता. फरार बोठे याने त्याचे दोन्ही मोबाइल घरीच ठेवले होते. पोलिसांनी हे मोबाइल जप्त केलेले आहेत. तसेच बोठे याच्या शोधासाठी विविध ठिकाणी पाच पोलीस पथक रवाना करण्यात आलेली होती. तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील व गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील बोठे याच्या बंगल्याची झडतीही घेतली होती. झडतीत पोलिसांना बोठे याचे रिव्हॉल्वर मिळून आले होते. बोठे याच्याकडे शस्त्रपरवाना असल्याचे तसेच तपासात महत्त्वपूर्ण ठरतील अशा काही वस्तूही मिळून आल्या होत्या.

बोठे याला अटक करण्यासाठी मुंबई, सोलापूरसह हैदराबाद पोलिसांची मदत अहमदनगर पोलिसांनी घेतली होती. बोठे हैदराबादमध्ये असल्याचे माहिती झाल्यानंतर पोलिसांनी शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र, याची माहिती मिळाल्याने आरोपी बोठे काही मिनिटांच्या अंतराने पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी शिताफीने त्याला पकडले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply