Breaking News

नढाळ गावाशेजारी बेकायदेशीर उत्खनन व बांधकाम

खालापूर : प्रतिनिधी

मौजे नढाळ गावास दोन पाझर तलाव आहेत. दोन्ही तलावाचे पाणी नढाळ गावाच्या शेजारील ओढ्यावर येते. या ओढ्याला लागून संत निरंकारी मंडळ यांची जमीन आहे. संत निरंकारी मंडळाने त्या मिळकतीला वॉल कम्पाउंडचे बांधकाम चालू केले आहे. हे बांधकाम करण्याकरिता संत निरंकारी मंडळाने कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली नसल्याची माहिती समोर येत आहे.

हे बांधकाम चुकीचे आसून ओढ्याच्या लगत बांधकाम करण्याचे ठरवल्याने हे बांधकाम पूर्ण झाल्यास दोन्ही तलावाचे पावसाळ्यात येणारे ओव्हरफ्लोचे पाणी हे नढाळ गावात घुसण्याची दाट शक्यता आहे. अशी भीती ग्रामस्थ व महिलांच्या मनात असल्याने सर्व ग्रामस्थ व महिला यांनी या ओढ्यालगत चालू असलेल्या कामाला हरकत घेतली आहे. याबाबत नढाळ ग्रामस्थ यांनी खालापूर तहसीलदार व लघुपाटबंधारे विभाग रा.जि.प. उपविभाग कर्जत यांची दि. 27 जानेवारी 2022 रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन हरकत अर्ज दिलेला आहे व हे बेकायदा उत्खनन व चालू असलेल्या बेकायदा बांधकामावर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

हे निरंकारी मंडळाचे ओढ्याशेजारचे बांधकाम पूर्ण झाल्यास एक दिवस दोन्ही तलावाचे पाणी गावात घुसून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नढाळ गावाशेजारील चालू असलेले संत निरंकारी मंडळाचे बेकायदा कामावर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply