पनवेल : वार्ताहर : पनवेल शहरातील डॉक्टर, वकील, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या एकत्रितपणाने सीनिअर्स ई-क्रिकेट क्लबच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले.
पनवेलकरांचे आयुष्य आनंदात जावे. त्यांना शुद्ध ऑक्सिजन तसेच सावली मिळावी व भावी पिढीही याचा आनंद घेऊ शकेल, या उद्देशाने पनवेलमधील 40च्या वर वयोमान असलेल्या सीनिअर्स ई-क्रिकेट क्लबतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमास क्रिकेट क्लबचे कर्णधार अप्पू कुंभार, अॅड. चंद्रशेखर वाडकर, सुभाष पाटील, उपकर्णधार नितीन पाटील, उद्योजक संजय पाटकर, नंदू पटवर्धन, डॉ. ययाती गांधी, डॉ. आशिष गांधी, डॉ. रवींद्र राऊत, डॉ. नितीन पोवळे, डॉ. संकेत पवल, गौरव कौशिक, डॉ. सागर ठाकूर, सागर आटवणे, डॉ. विकास पाटील, डॉ. इंदर चव्हाण, रवींद्र घाडगे, विजय पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, माने, त्रिशुल म्हात्रे, हरी आखाडे, राजेश शेट्टीया, आर्किटेक्ट मंदार नारगौडी, सुखम हॉस्पिटलचे डॉ. संतोष जाधव आदी
उपस्थित होते.
या वेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात परिसरात वृक्षारोपण करून एक वेगळा उपक्रम राबविला. आगामी काळातही पनवेलकरांच्या दृष्टीने हिताचे ठरतील असे उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.