Breaking News

कोरोना… भीती नको… दक्षता घ्या!

सार्वजनिक आरोग्य विभागासह म्हसळ्यात प्रशासन सज्ज

म्हसळा : प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने म्हसळा तहसीलदार शरद गोसावी यांच्या दालनात म्हसळा तालुक्यातील आरोग्य, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, प्राथमिक शिक्षण विभाग नगरपंचायत, बालविकास प्रकल्प अधिकारी, पोलीस विभाग, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, पॅथॉलॉजिस्ट यांची कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. परदेशातून मागील 15 दिवसांपासून म्हसळा तालुक्यात आलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम म्हसळा, मेंदडी व खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक-सेविका, आशा व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. शहरातील लॉजमध्ये परदेशी नागरिकांचे वास्तव्य आहे का, लॉज व्यवस्थापनाकडून फॉर्ममध्ये माहिती संकलित होते किंवा कसे याबाबत पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग सतर्क आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश कांबळे यांनी या बैठकीत दिली.  तालुक्यातील म्हसळा, मेंदडी व खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण कल्याण समितीची बैठक झाली. त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण विभागाने कोरोना विषाणू संक्रमण प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती करण्यासाठी तालुक्यातील सर्व केंद्रांतील केंद्रप्रमुखांना केंद्रातील सर्व शिक्षकांच्या संपर्कात राहून सतर्क राहण्याचे आदेश गट शिक्षण अधिकार्‍यांनी दिले असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. कोरोना विषाणू संक्रमण, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती व शाळेतील विद्यार्थी, पालक यांना याविषयी शास्त्रोक्त माहिती देणे, गाव पातळीवरील अफवा थांबवणे ही महत्त्वाची जबाबदारी केंद्रप्रमुख व शिक्षकांवर असणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

म्हसळ्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातून 24ु7 नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. तपासणी  (डलीशशपळपस) केंद्र, विलगीकरण (र्टीरीरपींळपश) केंद्र आणि पूर्णतः विलगीकरण (खीेश्ररींळेप) सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे.

-डॉ. गणेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी, म्हसळा

कोरोनासंदर्भात अर्धवट माहिती असणारे, चुकीचे, भीती उत्पन्न करणारे संदेश कोणीही सोशल मीडियावर पाठवू नयेत. विविध अधिकृत स्त्रोतांकडून खात्री करून घेतल्याशिवाय याविषयीचे संदेश पुढे पाठवू नयेत.

-शरद गोसावी, तहसीलदार, म्हसळा

म्हसळा तालुक्यातील 39 ग्रामपंचायती, केंद्रशाळा, ग्रामसेवक, शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून कोरोनाविषयक जनजागृती फलक लावणे, गाववाड्यांवर भेटी देऊन कोरोनाबाबत जनजागृती करणे असे कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

-वाय. एन. प्रभे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती-म्हसळा

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply