Breaking News

निर्भयाच्या दोषींची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव

नवी दिल्ली ः निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या तिघा दोषींनी आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता या तिघांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका दाखल केली आहे. दिल्ली न्यायालयाने चारही आरोपींना 20 मार्चला फासावर लटकवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व कायदेशीर पर्यायांचा अवलंब करून झाल्यानंतर आता तिघा दोषांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी फाशीची शिक्षा मिळालेल्या चारही आरोपींनी विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता आणि मुकेश यांच्या नातेवाइकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. इच्छामृत्यूची मागणी करणार्‍या आरोपींच्या नातेवाइकांमध्ये वयस्कर आई-वडील, भाऊ-बहीण आणि मुलांचा समावेश आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply