Breaking News

नेरळमधील रेल्वे समस्या प्राधान्याने सोडविणार -खासदार बारणे

कर्जत ः प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील जंक्शन रेल्वे स्थानक असलेल्या नेरळ रेल्वेस्थानकातील समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील, असे आश्वासन नेरळ स्थानकाची पाहणी केल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले. नेरळ येथे नियोजित कार्यक्रमासाठी आल्यानंतर नेरळ रेल्वे स्थानकात येऊन पाहणी केल्यानंतर नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी बोलताना खासदार बारणे यांनी सदर आश्वासन दिले.

खासदार श्रीरंग बारणे यांना नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने त्यांच्या पुणे येथील कार्यालयात भेटून नेरळ रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या समस्यांबद्दल निवेदन दिले होते. त्यावेळी खासदार बारणे यांनी आपण लोकसभा निवडणुकीनंतर नेरळ स्थानकात स्वतः येऊन पाहणी करू, असे आश्वासन नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी यांना दिले होते. नेरळ येथे नियोजित कार्यक्रमासाठी आल्यानंतर आधी खासदार बारणे हे रेल्वेच्या अधिकारी वगार्ंसह नेरळ स्थानकात पोहचले .तेथे नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर यांनी नेरळ स्थानकात सरकता जिना मंजूर करावा, मुंबई एन्डकडे अर्धवट अवस्थेत असलेल्या पादचारी पुलाची निर्मिती करावी, फलाट एकवर मुंबई येथून येणारे पर्यटक प्रवासी हे उतरत असतात. त्यासर्व प्रवाशांच्या सोयीसाठी सुलभ शौचालय उभारण्यात यावे, नेरळ रेल्वे स्थानकात मेन लाईनवरील दोन्ही फलाटांवर निवारा शेड उभारणे या मागण्यांसह रात्री अकरानंतर मुंबईकडे जाण्यासाठी एक उपनगरीय लोकल कर्जत येथून सुरू करावी तसेच कर्जत-ठाणे दरम्यान शटल सेवेच्या फेर्‍या वाढविण्यात याव्यात, कर्जत-कल्याण दरम्यान शटल सेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.                      

खासदार बारणे यांनी नेरळ स्थानकात आल्यानंतर फलाट दोनवरून अर्धवट असलेल्या निवारा शेडची तसेच अर्धवट असलेल्या कर्जत एन्डकडील पादचारी पुलाची पाहणी केली. त्याचवेळी सध्या अस्तित्वात असलेल्या पादचारी पुलाची पाहणी करून त्या पुलाच्या दोन्ही फलाटांवर सरकता जिना करता येईल की लिफ्ट बसविता येईल याची देखील पाहणी करून माहिती स्थानक प्रबंधक आणि रेल्वे अधिकारी यांच्याकडून करून घेतली. त्यावेळी नेरळ प्रवासी संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply