Breaking News

रायगडात पायी जाणार्‍यांची दिशाभूल

पनवेल : प्रतिनिधी

मुंबईमध्ये धारावी झोपडपट्टीचा परिसर कोरोना रुग्ण सापडल्याने पोलिसांनी बंद केल्यावर घाबरलेलले नागरिक आपल्या गावाची वाट धरू लागले आहेत. राज्यात सार्वजनिक वाहातूकीच्या सर्व सुविधा बंद असतांनाही लहान मुले कडेवर घेतलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक चालत पनवेलला येत आहेत. या ठिकाणी त्यांना काही तरूण खारपाडा तपासणी नाक्याच्या पुढून टेम्पो सुरू आहेत, असे सांगून त्यांची दिशाभूल करीत आहेत की, खरेच रायगड पोलिसांच्या आशीर्वादाने अशी वाहतूक सुरू आहे. याची चौकशी होणे

गरजेचे आहे. 

रायगडमधील अनेक गावातील कुटुंबे मुंबईत नोकरी धंद्यासाठी रहात आहेत. बहुसंख्य कुटुंबे छोटी मोठी कामे करीत असल्याने धारावीच्या परिसरात रहातात. त्यांचे हातावर पोट असल्याने परिसर पोलिसांनी बंद केल्यावर आता काय करायचे म्हणून अनेक कुटुंबानी रात्रीच्या काळोखात आपली लहान मुले, घरातील ज्येष्ठ नागरिकांसह रस्ता आणि रेल्वे मार्गावरून चालत पनवेल डेपो गाठून तेथून गावाला जायचा निर्णिय घेतला. खांदेश्वर स्टेशनचा परिसर किवा कळंबोली जवळून अनेक रिक्षावाले त्यांना भरमसाठ भाडे घेऊन पुढे पोलीस उभे असल्याने पनवेलला पेट्रोल पंपाजवळ आणून सोडत आहेत.गेले दोन-तीन दिवस अशी अनेक कुटुंबे पनवेल आगाराजवळ येत आहेत. पनवेल एसटी स्टँडजवळ काही तरुण त्यांना बुधवारी जित्याहून गाडीची व्यवस्था असल्याचे सांगत होते. गुरुवारी ही महाड तालुक्यात जाणारे 5-6 जणांचे कुटुंब आले होते. त्यात दोन लहान मुले एक वृद्ध महिला यांना एक तरुण खारपाडा पुलाच्या पुढून टेम्पो सुरू असल्याची माहिती देत होता. त्याला सगळे बंद असताना खोटी माहिती का देतोस विचारल्यावर खरेच तेथून टेम्पो सुरू आहेत असे सांगितले. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात रायगड पोलिसांच्या आशीर्वादाने अशी वाहतूक खरेच सुरू आहे का? की या अडलेल्या लोकांची फसवणूक करण्यात येत आहे. असल्यास अशा तरूणांवर कारवाई कोण करणार पनवेल मध्ये जे रिक्षावाले यांना आणत आहेत त्यांच्यावर कारवाई होईल का? नाहीतर आगीतून सुटलो आणि फुफाट्यात फसलो अशी त्यांची अवस्था होईल.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply