Breaking News

स्पीहा व एमजीआरएसएकडून वृक्षारोपण

पनवेल : रामप्रहर वृत्त

सत्संग असोसिएशनच्या मुंबई आणि आकुर्ली पनवेल केंद्राच्या वतीने स्पीहा या पर्यावरणवादी संस्थेच्या सहकार्याने शनिवारी (दि. 1) जागतिक वृक्षारोपण दिन साजरा करण्यात आला. सदस्यांनी घराच्या जवळ, मैदानात वृक्षांची लागवड केली. तर काही ठिकाणी रोप तयार करण्यासाठी बीजारोपण करण्यात आले.

स्पीहा ही स्वयंसेवी संस्था स्वस्थ पर्यावरण, पर्यावरणशास्त्र व पर्यावरणविषयक काम भारतासह जगभरात करते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  स्पिहा सदस्यांनी जगभरात 115 पेक्षा जास्त ठिकाणी हजारो वृक्षांची लागवड केली. 4 खंडातील 75 शहरांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. मोहिमेमध्ये 1000 हून अधिक स्वयंसेवकांनी भाग घेतला आणि सुमारे 60 प्रकारची झाडे लावले. या आंतरराष्ट्रीय वृक्षारोपण मोहिमेमध्ये महाराष्ट्र आणि गुजरात राधास्वामी सत्संग असोसिएशने सुद्धा यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. 2 जुलै रोजी झालेल्या बैठकीत या असोसिएशन 2021 पर्यंत किमान 1000 झाडे लावण्याचा संकल्प केला. एमजीआरएसएकडे संगोपनासाठी यापूर्वीच सुमारे 800 झाडे आहेत आणि 400 रोपे सत्संग वसाहतींमध्ये आणि सत्संग संकुलात लावण्यात आले आहेत. मुंबई आणि आकुर्ली पनवेल केंद्रातून याकरता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अगोदर सत्संग केंद्रांने  मैदानात 121 आणि कुंडीत 9 33 वृक्ष लागवड केली आहे. एमजीआरएसएचे प्रादेशिक अध्यक्ष  पी. एस. मल्होत्रा यांनी 1 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग  घेतल्याबद्दल सर्व शाखा व सत्संग केंद्रांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply