Breaking News

‘खरी माहिती देऊन सहकार्य करा’

पनवेल : प्रतिनिधी

खारघर परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने तेथे पनवेल महापालिकेमार्फत आशा स्वयंसेविका, शिक्षिका घरोघरी जाऊन कोरोनासदृश्य लक्षणे असल्यास सर्व कुटुंबियांची माहिती घेत आहेत. त्यांना खरी माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केल आहे खारघर सेक्टर 15 येथील घरकुल गृहसंकुलातील एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने रविवारी संध्याकाळी त्याला मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. त्यांचे मेडिकल रिपोर्ट तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट बुधवारी पॉझिटिव्ह आल्याने महापालिकेमार्फत आशा स्वयंसेविका आणि शिक्षिका घरोघरी जाऊन कोरोनासदृश्य लक्षणे असल्यास सर्व कुटुंबीयांची माहिती घेत आहेत. त्यात नाव, वय, मोबाईल नंबर, तसेच रोगाची लक्षणे जसे सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, श्वास घेण्यास त्रास व कधीपासून ही लक्षणे आहेत तो कालावधी, अशी विचारणा केल्यावर कृपया खरी माहिती द्यावी. त्यामुळे कोणी संशयित रुग्ण असेल तर तत्काळ त्यास अलगीकरण करून उपचार सुरू करता येतील. कोणाही खोटी माहिती देऊ नये. कृपया सुरक्षित अंतर ठेवून व संबंधितांची कोणतीही अडवणूक न करता माहिती द्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply