नवी मुंबई : प्रतिनिधी
बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने गरीब व गरजू नाका कामगार, दगडखाण कामगार यांना बुधवारी (दि. 8) तुर्भे येथील डॉ. आंबेडकरनगर, हनुमाननगर, व इंदिरानगर परिसरात 3000 किलो तांदूळ, 300 लिटर खाद्यतेल व 300 किलो डाळ अशा मोफत धान्याचे वितरण करण्यात आले. हे धान्यवाटप स्थानिक नगरसेवक अमित मेढकर यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. यापूर्वीही आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना, प्रत्येक घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मोफत मास्क तसेच सॅनिटायझर वाटप करण्यात आले आहेत. तसेच गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंची तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे 10 टन धान्य वाटप करण्यात आले असल्याची माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली. या वेळी भाजप महामंत्री विजय घाटे, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, समाजसेविका दीप्ती भार्गव, अमित मेढकर, अंकुश मेढकर, महिला उपस्थित होत्या.
आज तुर्भे येथील नाका कामगार, दगडखाण कामगार यांना धान्याची कमतरता भासत आहे. हातावर पोट असलेल्या या गरीब व गरजुंना एक वेळच्या जेवणाचीही चणचण भासत आहे. अशावेळी त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे.
-मंदा म्हात्रे, आमदार