Breaking News

खंडाळा येथे अंध विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : वार्ताहर

श्री साई नारायणबाबा व श्री भगवती साई संस्थान पनवेल यांच्या वतीने अंध विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप खंडाळा येथे करण्यात आले.

खंडाळा येथे असलेल्या नॅब लायन्स होम फॉर एगींग ब्लाईंड खंडाळा येथील विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीमुळे दररोज वापरात असलेल्या अन्नधान्यासह इतर जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता होती. या संदर्भात त्यांनी पनवेलमधील श्री साई नारायणबाबा संस्थेची संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली असता या 100 विद्यार्थ्यांना तसेच 25 कर्मचार्‍यांना एक महिन्याचे पुरेल इतके अन्नधान्य व इतर वस्तू संस्थेच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

यापुढे सुद्धा त्यांना गरज लागल्यास श्री साई नारायणबाबा संस्थेच्या वतीने त्यांना मदत करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे पदाधिकारी राम थदानी यांनी दिली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply