Breaking News

भारतीय क्रीडाप्रेमींना गुगलकडून अनोखे सरप्राइज

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था

ब्रिस्बेनमधील गाबा मैदानवर भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष गुगलही करीत आहे. गुगलवर इंडियन क्रिकेट टीम किंवा इंडिया नॅशनल क्रिकेट टीम असे टाइप करून सर्च केल्यास व्हर्चुअल आतषबाजी दिसते.

बॉर्डर-गावसकर मालिका भारताने जिंकल्यानंतर गुगुलने क्रीडा चाहत्यांना हे खास सरप्राइज दिले आहे. हा ऐतिहासिक विजय प्रत्येक भारतीयाने साजरा केला. कोणी सोशल मीडियावर तर कोणी फटाके वाजवून.

अनेकांनी फेसबुक आणि ट्विटवर आपल्या भावानांना वाट मोकळी करून दिली. बुधवारी गुगलनेही ट्विट करून अनोखे सरप्राइज दिले. याबाबल अनेक क्रीडाप्रेमींनी गुगलचे आभारही मानले आहेत.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply