पनवेल, उरण परिसरातील शाळा, महाविद्यालयात विविध उपक्रम
- रामशेठ ठाकूर विद्यालयात गणवेशवाटप
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा उपक्रम
खारघर : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील ओवेपेठ येथील रामशेठ ठाकूर माध्यमिक विद्यालयात शिकत असणार्या आठवी ते दहावी च्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.
श्री. रामशेठ ठाकूर सामिाजक विकास मंडळाचे संस्थापक माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.15/09/2023 रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांना वह्या, दफ्तर तसेच इतर शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात येत असते.त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी या विद्यालयात शिकणार्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचा व पी. टी. चा असे प्रत्येकी दोन गणवेशांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष वाय. टी. देशमुख, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे तसेच भाजपचे पनवेल तालुका तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रभाकर जोशी साहेब उच्च माध्यमिक विभागाच्या प्राचार्या निशा नायर यांच्या सह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यपक संतोष खांदेकर यांनी केले. सुत्रसंचलन भूमी जोशी हिने केले. तर मान्यवरांचे आभार हिना शेख हिने मानले.
रामशेठ महाविद्यालयात मुलाखती व प्रशिक्षण
खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात 14 ते 16 सप्टेंबर यादरम्यान सेंटर फॉर करिअर गायडन्स ट्रेनिंग अँड प्लेसमेंट व मॅजिक बस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुलाखती व प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.
या प्रशिक्षण व मुलाखतींसाठी मॅजिक बस फाउंडेशनचे पदाधिकार्यांनी उपस्थित राहुन त्यांच्या कंपनीमध्ये असणार्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या उपलब्ध संधी व त्यासाठी विद्यार्थ्यांनी मुलाखतीची करावयाची तयारी तसेच प्रशिक्षण दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शाखेतील माजी व आजी विद्यार्थी व विद्यार्थिनींना मुलाखतीचा व प्रशिक्षणाचा फायदा घेतला.
या मुलाखतीचे व प्रशिक्षणाचे आयोजन सेंटर फॉर करिअर गायडन्स ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे समन्वयक प्रा. रेवन शिंदे यांनी केले आहे तसेच प्रा. महेश धायगुडे, प्रा. डॉ. महादेव चव्हाण, प्रा. रूपाली नागरेकर, प्रा. योगिता पाटील, प्रा. डॉ. कविता शिंदे, प्रा. सायमा नाटेकर, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी तसेच शिक्षकेतर कर्मचार्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.