Breaking News

रोजच्या चुकीच्या सवयींमुळे निर्माण होतात गंभीर समस्या

दैनंदिन जीवन जगत असताना आरोग्याच्या अनेक लहानमोठ्या कुरुबुरी उद्भवत असतात. सायटिका एक स्थिती आहे ज्यात नसांना सूज येणं, वेदना होणं अशा समस्या निर्माण होत असतात. सायटिका या आजारात पाठदुखीची समस्या जाणवते. या वेदनेमुळे संपूर्ण अंगदुखीची समस्यासुद्धा उद्भवू शकते. वेळीच लक्ष न दिल्यास त्रास वाढत जाऊ शकतो . रोजचं जीवन जगत असताना केलेल्या चुकांमुळे असा त्रास जाणवतो.

सध्या घट्ट कपडे घालण्याची फॅशन असल्यामुळे मुली टाईट कपडे जास्त घालतात, पण ही सवय घातक ठरू शकते. याशिवाय अतिघट्ट कपड्यांमुळे शरीरातील रक्त गोठलं जाऊन संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. त्यामुळे वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते.

टाचांचा संबंध पाठीशी असतो. त्यामुळे चपला किंवा बुट व्यवस्थित आरामदायी नसतील, तर त्याचा परिणाम पाठीवर होण्याची शक्यता असते. तुम्ही ज्या चपला वापरता त्यात कंफरर्टेबल वाटत नसेल तर शरीरावर परिणाम होतो. जास्त वेळपर्यंत शुजचा वापर केल्यामुळे पाठीवर ताण येऊ शकतो.

जर वॉलेट मागच्या खिशात ठेवायची सवय असेल तर ही सवयही महागात पडू शकते. पिरिफोर्मिस मसल्सना बाधा पोहोचल्यामुळे पिरिफोर्मिस सिंड्रोम हा आजार होण्याची शक्यता असते. मागच्या भागात वेदना होणं, काळपटपणा येणं अशी समस्या उद्भवते. त्यामुळे मागच्या खिशात शक्यतो पाकिट ठेवणं टाळा.

अनेकांना सतत सात ते आठ तास बसून काम करावं लागतं त्यामुळे मासपेशींवर दबाव येत असतो. त्यामुळे कोणतेही अवयव दुखण्याची  समस्या उद्भवू शकते. त्यामुळे सतत तुमचं सतत बसून राहायचं काम असेल तर अध्येमध्ये उठून राऊंड मारा. सतत एकाचजागी बसून राहिल्यामुळे हात-पाय सुन्न पडण्याची शक्यता असते.

जास्त टेंशन किंवा स्ट्रेस शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतो. जास्त वेळ ताण- तणाव घेतल्यामुळे डोकेदुखी, पाठ दुखी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकता. यात सायटिका पेनचासुद्धा समावेश असू शकतो. त्यामुळे शक्य होईल तितकं आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

Check Also

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी साता समुद्रापार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी नाव हे साता समुद्रापार पोहचले असून या सुसज्ज …

Leave a Reply