Breaking News

लग्नाआधी एचआयव्ही टेस्ट होणार बंधनकारक?

पणजी ः वृत्तसंस्था – गोव्याच्या नागरिकांना भविष्यामध्ये लग्न करण्याआधी एचआयव्ही टेस्ट करून घ्यावी लागणार आहे. तसा कायदाच पास करण्याचा विचार राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे करीत असून त्यासाठी सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत.

देशामध्ये एचआयव्ही-एड्सच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्न करत असते. या बाबतीत लोकांना जागरूक केले जाते, पण गोव्यासारखे छोटेसे राज्य मात्र या रोगाच्या वाढीला आळा घालण्यासाठी एक नवीन कायदा पारित करण्याचा विचार करीत आहे. लग्नाची नोंदणी करण्याआधी पती-पत्नी दोघांनीही एचआयव्हीची तपासणी करून घेणे बंधनकारक करण्याचे विधेयक लवकरच गोवा विधानसभेत सादर होऊ शकते. गोवा येथे मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक येत असतात. देहव्यापाराचे प्रमाणही या राज्यात अधिक आहे. त्यामुळे एड्सचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. याचाच विचार करून लग्नाची नोंदणी करण्यासाठी एचआयव्ही चाचणी बंधनकारक करण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे.

एचआयव्हीसोबतच लग्नाआधी थॅलेसेमियाची चाचणी करणेही बंधनकारक करण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. गोव्यासारख्या पुरोगामी राज्यामध्ये या दोन्ही चाचण्या लग्नाआधी बंधनकारक करणे गरजेचे आहे. मी या कायद्याचे 100 टक्के समर्थन करेन, असे विश्वजित राणे यांनी सांगितले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply