मंत्री आदिती तटकरे यांनीही केली पाहणी
उलवे नोड : रामप्रहर वृत्त
मातृभाषेत शिक्षण घेतल्यावरही आपली चांगली प्रगती होऊ शकते, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे नोडमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनावेळी केले. दरम्यान, या विज्ञान प्रदर्शनाला राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनीही भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
पनवेल पंचायत समिती शिक्षण विभाग, गणित विज्ञान अध्यापक मंडळ आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या माध्यमातून 52वे पनवेल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन उलवे सेक्टर 12 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये करण्यात आले आहे. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विविध विषयांवर प्रकल्प सादर केले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 27) झाले. या प्रदर्शनाला महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनीही भेट देऊन पाहणी केली.
या वेळी ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, साईचरण म्हात्रे, सुदर्शन घरत, जयवंत देशमुख, किशोर पाटील, मिनाक्षी पाटील, भार्गव ठाकूर, विश्वनाथ कोळी, शिवदास कांबळे, चंद्रकांत घरत, प्राचार्य राज अलोनी आदी उपस्थित होते.