नवी मुंबई : बातमीेदार
नवी मुंबईत सोमवारी (दि. 4) कोरोनाचे 34 नवे रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 348वर पोहोचला आहे. यामध्ये मुंबईतून आलेल्या रुग्णांमुळे नवी मुंबईकरांना बाधा होत असल्याचे समोर येत असल्याने नवी मुंबई शहर हे कम्युनिटी ट्रान्समिशनचा बळी ठरत असल्याचे चित्र आहे.
नव्या रुग्णांमध्ये नेरुळ- जुईनगर 3, कोपरखैरणे 10, वाशी 2, बेलापूर-सीवूड्स 2, तुर्भे-सानपाडा 2, घणसोली 6, ऐरोली 1 आणि दिघा 8 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त मिसाळ यांनी नवी मुंबईत दारूची दुकाने उघडण्यावर बंदी कायम ठेवली आहे. या निर्णयाचे स्वागत होत आहे.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …