Breaking News

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांची पुण्यतिथी होणार साधेपणाने साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त
कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची येत्या गुरुवारी (दि. 7) 32वी पुण्यतिथी आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता भगतसाहेबांची पुण्यतिथी सामाजिक अंतराचे नियम पाळून साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे.
जनार्दन भगत यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. केवळ राजकीयच नाही, तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. आयुष्यापेक्षा ध्येय्य मोठे असले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी समाजात रूजवली. त्यांच्या नावाने व आशीर्वादाने सुरू झालेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने दरवर्षी पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो, पण यंदा कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेऊन संस्थेच्या प्रत्येक शाखेत साधेपणाने व फक्त चार जणांच्या उपस्थितीत अभिवादन करण्याचा निर्णय संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतला आहे. भगतसाहेबांच्या मूळ गावी शेलघर येथील निवासस्थानीही सामाजिक अंतर नियमांचे पालन करून फक्त कुटुंबाकडून आदरांजली वाहण्यात येणार आहे.

Check Also

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक अडथळे दूर करीत काही महिन्यांत पूर्णत्वास येणार …

Leave a Reply