उरण ः प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन जारी केल्याने गरीब, गरजू लोकांची उपासमार होत आहे. अशा गरीब, गरजूंना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने उरण नगरपालिका हद्दीतील कामठा रोडवरील कामगार वसाहत येथील ओम साई सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने सोसायटीजवळ
कचराकुंडीतील कचरा साफ करणार्या लोकांना तसेच सोसायटीमध्ये सफाई करणारे, पाणी चालू करणारे व इतर मदत करणार्या कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी सोशल डिस्टन्सिंग ठेवून व शासकीय नियमांचे पालन करून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
जीवनावश्यक वस्तूंमध्ये तांदूळ, डाळ, मीठ पुडी, गोडेतेल, कांदे, बटाटे आदी वस्तू देण्यात आल्या. या वेळी ओम साई सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे सेक्रेटरी संजय कडवे, खजिनदार प्रफुल्ल केणी, गिरगोल फर्नांडिस, विजय पवार, भूषण पाटील, जितेंद्र चव्हाण, प्रसाद भोभू, श्रीराज काजी व ओम साई सहकारी
गृहनिर्माण सोसायटीचे इतर सदस्य उपस्थित होते. ओम साई सोसायटीने गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मदतीचा हात दिला आहे. त्याप्रमाणेच उरण शहरातील हा आदर्श घेऊन आपापल्या सोसायटीत काम करणार्या गरिबांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन विजय पवार यांनी केले आहे.