पनवेल : रामप्रहर वृत्त
कामोठे येथील भाजप नगरसेवक विजय चीपळेकर यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी रुग्णांसाठी बिस्कीट पुडे आणि वयोवृध्द रुग्णांसाठी बिस्कीट व नारळ पाणी वाटप केले. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विजय चीपळेकर हे कामोठे येथील एमजीएम कोविड19 रुग्णालयात एका परिचित रुग्णाला गरजेच्या वस्तू देण्यासाठी गेले असता त्यांना रुग्णालयातील कर्मचार्यांकडून या रुग्णालयात कोरोनाचे 180 अॅक्टिव्ह रुग्ण उपचारासाठी दाखल असल्याचे कळले. या रुग्णांना नातेवाइक किंवा मित्र देखील भेटायचे टाळतात असे कळाले. तेव्हा विजय चिपळेकर यांनी येथील सर्व रुग्णांसाठी बिस्कीट पुडे आणि वयोवृध्द रुग्णांसाठी बिस्कीट व नारळ पाणी स्वखर्चाने आणले आणि या रुग्णांना वाटप करण्यासाठी रुग्णालय कर्मचार्यांकडे सुपुर्द केले. विजय चिपलेकरांच्या या आपुलकीने तेथील रुग्णांनी संतोष व्यक्त केला.