उरण : वार्ताहर
विद्यार्थ्यांना शिक्षण सवलती करिता देण्यात येणारा प्रवाशी पास 1 जानेवारी 2020 पासून स्मार्ट कार्ड मध्ये रुपांतरीत होणार आहे. तर सध्या अस्तित्वात असणारा कागदी पास हा 31 डिसेंबर 2019 पर्यंतच वैध्य असणार आहे. त्यामुळे अशा सूचना देणारा फलक उरण एसटी डेपो मध्ये लावण्यात आला आहे.
गेल्या 70 वर्षा पेक्षा अधिक प्रवासी सेवे साठी तत्पर असणारी महाराष्ट्र राज्य शासनाची परिवहन सेवा सपुर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठी परिवहन सेवा म्हणून ओळखली जाते. प्रवाश्यांनाही अनेक सेवा सवलती देणार्या एसटी महामंडळाने काळानुसार बदल केला आहे. माय इंडिया डिजिटल इंडिया ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर देशात सर्व क्षेत्रा डिजिटली कार्यप्रणालीचा वापर मोठया प्रमाणात होऊ लागला. याबाबत बोलताना उरण एसटी आगार प्रशासनाने सांगितले आहे कि, राज्य परिवहन महामंडळाने आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षणा करीता प्रवासात सवलत म्हणून देण्यात येणारा कागदी पास हा स्मार्टकार्ड स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे उरण एसटी आगारात विद्यार्थ्यांच्या माहिती करिता सूचना फलक लावण्यात आला आहे. तसेच त्याबाबत सूचनाही विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच या फलकानुसार 1 जानेवारी 2020 पासून कागदी पास बंद होणार असून विद्यार्थ्यांनी स्मार्टकार्ड पाससाठी नोंदणी करण्याच आवाहन करण्यात आलं आहे.