Breaking News

पेरणीच्या हंगामाला सुरुवात

मोहोपाडा : प्रतिनिधी – पावसाचे आगमन गेले तीन चार दिवस होत असल्यामुळे शेतकर्‍यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. या वर्षी 7 जून लाच पावसाने आपले अस्तित्व दाखविल्याने ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी बैलाच्या साह्याने पेरणी करण्यासाठी सुरुवात केली आहे. पावसाळ्याचा हंगाम सुरु होत असल्याने शेतकरी पेरणीची जोरदार तयारीला लागलेला असल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी आपणांस पहावयास मिळत आहे.

परंतु यावर्षी पावसाचे आगमन कसे होणार या विचारांने हवामान खाते, पंचागकारांनी भविष्य वर्तविलेले असल्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीस सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांचे अल्प प्रमाणात नुकसान झाले होते. तर काहींना मोठे नुकसानं सहन करावे लागले. ते ह्या वर्षी होवू नये, या साठी वरुण राजावर विश्वास ठेवून पेरणी करण्यास सुरुवात झाली आहे.

शेतीशिवाय पर्याय नसल्यामुळे शेतकरी शेती करण्यासाठी सज्य झाला आहे. ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असताना या पावसाचे आगमनाने सर्वत्र धरतीवरती एक प्रकारचे चैतन्य निर्माण होणार आहे.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply