Breaking News

अवैध 1400 लिटर गावठी दारु हस्तगत

पनवेल : वार्ताहर – अवैध गावठी दारुची वाहतूक करणार्‍या इको गाडीचा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेलने पाठलाग करून सदर गाडी ताब्यात घेतली असता त्यामध्ये 1400 लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेलचे निरिक्षक एस. एस. गोगावले यांना खात्रीलायक बातमी मिळाली की, मुंबई-गोवा हायवे पळस्पे फाटा येथे गावठी दारुची वाहतूक होणार आहे. त्यानुसार या गाडीचा पाठलाग करून ही गाडी अलिबाग कोळीवाडा येथे पकडली असता अंधाराचा फायदा घेत गाडी चालक पळून गेला. परंतु तो वापरत असलेली मारुती सुझुकी कंपनीची इको गाडी (क्र.एमएच-05-सीएम-3552) यामध्ये रबरी ट्युबा गावठी दारुने भरलेला असा मिळून जवळपास चार लाख 37 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी पसार झालेल्या आरोपीचा शोध करीत आहेत.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबईचे आयुक्त कांतीलाल उमाप, अंमलबजावणी व दक्षता विभागाच्या संचालक उषा वर्मा, विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण, अधिक्षक सिमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. एस. गोगाावले, दुय्यम निरीक्षक शिवाजी गायकवाड, जवान पालवे, राणे, नरेश गायकवाड, जवान झिंटे, मनोज भोईर, अनंत जगदांडे आदींच्या पथकाने सहभाग घेतला होता. याबाबत अधिक तपास दुय्यम निरीक्षक शिवाजी गायकवाड करीत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply