Breaking News

शिवरायांचा आठवावा प्रताप…

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्वांना माहितीच आहे. आज देखील ह्यांना हिंदूहृदय सम्राट म्हणून म्हणतात. तर काही लोक त्यांना मराठ्यांचा अभिमान असेही म्हणतात. ते भारतीय प्रजासत्ताकचे महान सेनानायक होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला.राष्ट्राला परकीय आणि आक्रमक सत्तेपासून मुक्त करून संपूर्ण भारतात सार्वभौमिक स्वतंत्र राज्य बनविण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केले होते.

बालपणातच गड जिंकणे शिकले

बालपणातच शिवाजी महाराज आपल्या सवंगड्यांना घेऊन त्यांचे नेतृत्व करून युद्धाचे आणि गड जिंकण्याचे खेळ खेळायचे. तारुण्यावस्थेत येतातच त्यांचे बालपणीचे खेळ खरोखरच शत्रूंवर हल्ला करून त्यांचे गड जिंकणारे होऊ लागले. पुरंदर आणि तोरणागड जिंकल्यावर तर त्यांच्या नावाची आणि त्यांनी केलेल्या कार्याची प्रसिद्धी सार्‍या दक्षिणेकडे पसरत गेली. ही बातमी दिल्ली आणि आग्रापर्यंत पोहोचली आततायी तुर्की, यवन आणि त्यांचे सर्व शासक आणि सहकारीदेखील छत्रपतींचे नाव ऐकून घाबरायचे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने घाबरलेला बिजापूरचा राजा अदिलशहा याने शिवाजी महाराजांच्या वडिलांना म्हणजे छत्रपती शहाजी महाराजांना अटक करून तुरुंगात टाकले. शिवाजी महाराजांनी नीतीने आणि सामर्थ्याने आपल्या वडिलांना त्याच्या ताब्यातून सोडविले. तेव्हा चिडून बिजापुराच्या त्या राजाने शिवाजी महाराजांना पकडून आणण्याचा आदेश दिला. त्याचा धूर्त सेनापती अफजल खान याने बंधुत्वाचे खोटे नाटक आणि कट कारस्थान रचून शिवाजी महाराजांना मारण्याचा डाव रचला. परंतु तोच महाराजांच्या हातून मारला गेला. आपल्या सेनापतीला मारलेले बघून अफजल खानच्या सैन्याने पळ काढला.

मुघलांशी लढत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या सामर्थ्याला बघून मुघल बादशहा औरंगजेब घाबरला आणि त्याला काळजी वाटू लागली. त्याने दक्षिणेस नेमलेल्या सुभेदारांना शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याचा सल्ला दिला. मात्र शिवाजी राजांशी  लढताना शाहिस्ते खानाला पुत्र गमवावा लागला, त्याचे स्वतःचे बोट कापले गेले. त्याला रणांगणातून पळ काढावा लागला. या घटनेनंतर औरंगजेबाने आपल्या सर्वात प्रभावशाली सेनापती मिर्जा राजा जयसिंहच्या नेतृत्वात सुमारे एक लाखाची फौज पाठविली. राजा जयसिंगाने बिजापूरच्या सुलतानाशी संधी करून पुरंदरच्या किल्ल्याला काबीज करण्याच्या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 24 एप्रिल,1665 रोजी ’वज्रगड’ किल्ला ताब्यात घेतला. पुरंदर किल्ल्याचे रक्षण करताना शिवाजी महाराजांचे शूर सेनापती मुरारजी बाजी हे हुतात्मा झाले. 22 जून 1665 रोजी  पुरंदरचा तह झाला.

शिवाजी महाराजांचे सैन्य

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वतःचे सैन्य तयार केले.  महाराजांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या सैन्यात 30 -40 हजार नियमित आणि कायमस्वरूपी नेमणूक केलेले घोडेस्वार, एक लाख पादचारी आणि 1260 हत्तींचा समावेश होता.तोफखाने किती होते त्या बाबतीत ठळक माहिती नाही.

घोडदळ किंवा घुडस्वार सैन्य हे दोन भागात विभागले होते. बारगीर आणि घुडस्वार सैनिक होते. त्यांना राज्याकडून घोडे आणि शस्त्रे देण्यात येत होती. सिल्हदार ज्यांना स्वतःच व्यवस्था करावी लागत होती. या घोडदळाच्या सर्वात लहान तुकडीत 25 शिपाई असायचे. ज्यांच्यावर एक हवालदार असायचा पाच हवालदारांचा मिळून एक जुमला असायचा. ज्यांच्यावर एक जुमलेदार असायचा. दहा जुमलेदार मिळून एक हजारी असायचा आणि पाच हजारीच्यावर एक पंचहजारी असायचा. तो सरनौबताच्या खाली असायचा. प्रत्येक 25 तुकड्यांसाठी राज्याकडून एक नाविक आणि भिश्ती दिले जात होते.

छत्रपतीचे किल्ले

मराठा सैन्य यंत्रणेची वैशिष्ट्ये होते किल्ले. कथावाचकांच्या मते, छत्रपती शिवाजी महाराजांकडे एकूण 250 किल्ले होते. महाराजांनी अनेक गड जिंकले होते, ज्यामध्ये एक सिंहगड किल्ला. हा गड जिंकण्यासाठी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना पाठविले होते. विजय मिळविण्यासाठी तानाजींना प्राण गमवावे लागले. ‘गड आला पण सिंह गेला‘ असे उद्गार शिवाजी महाराजांनी तानाजींसाठी काढले होते. रायगड, चाकण, सिंहगड आणि पुरंदरसारखे किल्लेदेखील महाराजांच्या आधिपत्याखाली आले.

आपल्या सुरक्षेचे पूर्णपणे आश्वासन मिळाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आग्राच्या दरबारात औरंगजेबाला भेटण्यास तयार झाले.ते 9 मे 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुलासह म्हणजे संभाजीराजे आणि सुमारे 4000 सैन्यासह मुघल दरबारात हजर झाले, परंतु तिथे त्यांचे आदरातिथ्य औरंगजेबाने न केल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांनी भरलेल्या दरबारात औरंगजेबाला विश्वासघातकी म्हटले होते. औरंगजेबाने चिडून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मुलाला ’जयपूर भवन’ मध्ये नजरकैद केले. इथून छत्रपती शिवाजी महाराज 13 ऑगस्ट,1666 रोजी फळांच्या पेटीत बसून लपून निघाले होते आणि 22 सप्टेंबर रोजी रायगड पोहोचले.

गनिमी युद्धाचे अविष्कारक

असं म्हणतात की, भारतात प्रथमच गनिमीयुद्धाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. त्यांच्या या युद्धनीतीपासून प्रेरणा घेऊन व्हिएतनामींनी अमेरिकेशी लढाई जिंकली. या युद्धाच्या वर्णन त्याकाळातील रचलेल्या ’शिवसूत्र’ मध्ये सापडते. गोरिल्ला किंवा गनिमी युध्द म्हणजे हा एक प्रकारचा छापामार युध्द आहे. जेअर्धसैनिकांच्या तुकडी किंवा अनियमित सैनिकाने शत्रुसैन्याच्या मागे किंवा मागील बाजूने हल्ला करतात.

समर्थ रामदास

हिंदू पद पादशाहीचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी यांचे नाव भारतातील साधू-संतांमध्ये तसेच विद्वत समाजात प्रसिद्ध आहे. त्यांनी ’दासबोध’ नावाच्या एक ग्रंथाची रचना केली जे मराठी भाषेत लिहिले आहे.

संपूर्ण भारतात म्हणजे काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत त्यांनी 1100 मठ आणि आखाड्यांची स्थापना केली आणि स्वराज्याच्या स्थापनेसाठी जनतेला तयार करण्याच्या प्रयत्न केला. त्यांना आखाड्यांची स्थापना करण्याचा सर्व श्रेय दिला जातो, म्हणून त्यांना भगवान हनुमानाचे अवतार म्हटले आहे ते भगवान हनुमानाचे भक्त होते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या गुरुकडून प्रेरणा घेऊनच कोणतेही काम करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांना ’महान शिवाजी बनविण्यामध्ये सर्वात मोठे योगदान समर्थ रामदासांचे आहे.

आई तुळजा भवानीचे उपासक

महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे तुळजापूर. या स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांची कुळदेवी आई तुळजा भवानी स्थापित आहे. जे आजतायगत महाराष्ट्राच्या आणि इतर राज्याच्या अनेक रहिवाशींची कुळदेवी म्हणून प्रख्यात आहे किंवा प्रचलित आहे. वीर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची कुळदेवी आई तुळजा भवानी आहे. महाराज नेहमी त्यांचीच उपासना करायचे. अशी आख्यायिका आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांना खुद्द देवी आईने प्रगट होऊन तलवार दिली होती. सध्या ही तलवार लंडनच्या संग्रहालयात ठेवलेली आहे.

दीर्घ आजारामुळे 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या संपूर्ण साम्राज्याला त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाने छत्रपती संभाजी राजे यांनी सांभाळले.

साभार : वेब दुनिया

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply