Breaking News

माणगावात शिवजयंती उत्साहात साजरी

माणगाव : प्रतिनिधी

माणगांव नगरपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवारी (दि. 23) उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी शिवप्रेमींनी रायगडावरुन वाजत गाजत शिवज्योत आणली होती. खांदाड ग्रामस्थांनी सकाळी शिवप्रतिमेचे  पूजन करुन छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष केला.

खांदाड ग्रामस्थांनी शिवज्योतीसह माणगांव बाजारपेठेतून वाजत गाजत गुलालाची उधळण करीत शोभायात्रा काढली होती. या शोभायात्रेत राजिपचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती ज्ञानदेव पवार, तालुका युवा सेना अधिकारी कपिल गायकवाड, बाळा पवार, बाळा मांजरे, अल्पेश मांजरे, विशाल घर्वे तसचे शिवभक्तांसह महिला सहभागी झाल्या होत्या.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply