कळंबोली : रामप्रहर वृत्त
भगवानबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त कळंबोलीमध्ये सेक्टर 14 व 15 मधील चौकास श्री संत भगवानबाबा चौक असे नामकरण करण्यात आले. कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील व नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी हभप डॉ. हरिदास महाराज यांची उपस्थिती लाभली. तसेच भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबन बारगजे पिंपळनेरचे उपसरपंच बाळासाहेब बडे, युवा कार्यकर्ते व आयोजक अमोल पालवे उपस्थित होते.