Breaking News

नेरळमध्ये शिवज्योतीचे जल्लोषात स्वागत

कर्जत : बातमीदार

शिवजयंतीनिमित्त येथील श्याम कडव आणि प्रथमेश कर्णिक हे शिवप्रेमी तरुण गेल्या चार वर्षांपासून वेगवेगळ्या किल्ल्यांवरून नेरळमध्ये शिवज्योत आणतात. यावर्षी त्यांनी 240 किलोमीटरचे अंतर पार करून सज्जनगड येथून शिवज्योत आणली होती. तिचे नेरळमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथील स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेऊन 21 मार्च रोजी निघालेले 20 तरुण राष्ट्रीय महामार्गाने दिवसा विश्रांती आणि रात्रभर प्रवास करीत शनिवारी सकाळी नेरळला पोहचले.  सज्जनगडापासून नेरळ या 240 किलो मीटरच्या प्रवासात दररोज 80 किलो मीटरचे अंतर धावत पार करणार्‍या या तरुणांनी सातारा जिल्ह्यात एक आणि पुणे जिल्ह्यात एक अशा दोन ठिकाणी दिवसाची विश्रांती घेतली. नेरळ येथे पोहचल्यावर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवज्योत घेऊन येणार्‍या सर्व तरुणांचे कौतुक शिवाजी महाराज चौकात सत्कार करून करण्यात आले. श्याम कडव, प्रथमेश कर्णिक, निखिल धुळे, भूषण भोईर, आदित्य मोरखडे, निखिल खडे, संतोष राठोड, जीवन भोईर, राजेश हाबळे, निलेश ठोंबरे, धनंजय भोईर, किरण भोईर, तुषार भोईर, कल्पेश म्हसे, प्रथमेश देशमुख, संदेश पाटील, वेदांत शिंदे, राहुल साळुंके, कुणाल कांबरी, रंजन सकपाळ, चिन्मय पवार यांना शिवज्योत दौडीसाठी नेरळ सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीनेही सहकार्य केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply