पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने शनिवारी
(दि. 23) गुणवंत खेळाडूंच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्याला सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंना श्री. रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या वतीने नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून केले जाते. खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात शनिवारी पनवेल तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने गुणवंत क्रिकेट खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रभाग समितीचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, कामगार नेते रवींद्र नाईक, नगरसेवक संजय भोपी, तसेच प्रशांत करपे, धनराज पाटील, प्रमोद राईकर, अविनाश गायकवाड, सागर कांबळे आदी उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणातून क्रिकेटपटूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.