उलवे नोड : रामप्रहर वृत्त
उलवे नोड सेक्टर 18मधील ठाकूर रेसिडेन्सी, श्रीटुडे स्मरण, बेला विस्ता, एस. के. ठाकूर, लाईफ स्पेस, नैवेद्य स्मृती, राजरत्न पार्क, उलवे श्रमिक, ऋषिकेश अव्हेन्यू, भक्ती दर्शन, कामयानी कुंज या 11 सोसायट्यांनी मिळून अनमोल जीवन वेल्फेअर असोसिएशनची स्थापना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. या असोसिएशनचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, तसेच अमित नाईक, दीपक गोंधळी, कृष्णा नायर, किरण जगताप, वजीत शेख, दिलीप डोंगरे, प्रिया अडसूळे, मंजू जगताप, अनमोल जीवन वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष निवृत्ती मुरादे, सचिव आदेश बोराडे, खजिनदार बाळासाहेब कांबळे यांच्यासह पदधिकारी, कार्यकर्ते आणि रहिवासी उपस्थित होते.
अनमोल जीवन वेल्फेअर असोसिएशनची स्थापना झाल्याने सोसायट्यांच्या समस्या सुटण्यासाठी मदत होईल, असे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी केले.
दरम्यान, या कार्यक्रमाचे औचित्य साधून हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper