Breaking News

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना डेडलाइन; 14 दिवस व्हावे लागणार होम क्वारंटाइन

अलिबाग : प्रतिनिधी

गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्यासह इतर ठिकाणांहून रायगड जिल्ह्यात येणार्‍या चाकरमान्यांना 7 ऑगस्टपूर्वी जिल्ह्यात दाखल व्हावे लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना पुढचे 14 दिवस होमक्वारंटाइन रहावे लागणार आहे. या संदर्भात रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी परिपत्रक जारी केले आहे. 

रायगड जिल्ह्यात 15 हजारांच्या आसपास नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यासह राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशमूर्तीच्या उंचीवरदेखील निर्बंध घालण्यात आले आहेत. घरगुती बाप्पाची मूर्ती ही दोन फुटांची, तर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी चार फुटांपर्यंत मूर्ती ठेवता येणार आहे.  गणेशोत्सवासाठी कुणी स्वेच्छेने वर्गणी किंवा देणगी दिल्यास स्वीकारता येईल, मात्र घरोघरी जाऊन वर्गणी मागता येणार नाही. भपकेबाज जाहिराती किंवा पोस्टरबाजी करू नये, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

गणेश मंडपात निर्जंतुकीकरणाबरोबरच सॅनिटायझिंग, थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था असावी तसेच दिवसातून किमान तीन वेळा मंडपाचे सॅनिटाझेशन करावे, असे सूचित करण्यात आल्या आहेत. शासनाने गणेशोत्सवासाठी घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार होमक्वारंटाइन आदेशच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही कोरोना प्रतिबंधक समिती व सरपंच यांची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply