Breaking News

भाजप नेते आमदार रवींद्र चव्हाण यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले अभिनंदन; पदाधिकार्‍यांकडूनही शुभेच्छा

डोंबिवली : रामप्रहर वृत्त
भाजप नेते व आमदार रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विजयी झाल्याबद्दल पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी त्यांचे बुधवारी (दि. 27) पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिपेश म्हात्रे यांचा तब्बल 77 हजार 106 मतांनी पराभव करून विजय मिळवला. याबद्दल पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली शहराध्यक्ष रवींद्र पाटील, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारूशीला घरत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, अ‍ॅड. मनोज भुजबळ, बबन मुकादम, डॉ. अरुणकुमार भगत, मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, समीर ठाकूर, विकास घरत, राजू शर्मा, अमर पाटील, नरेश ठाकूर, विकास घरत, तेजस कांडपिळे, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, कामगार नेते जितेंद्र घरत, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष सदस्य अमित जाधव, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, किशोर चौतमोल, कीर्ती नवघरे, विनायक मुंबईकर, अमित ओझे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, राकेश भुजबळ, रमेश मुंडे, भाऊ भगत, सुधीर पाटील, दशरथ म्हात्रे, सनी यादव, चंद्रकांत कडू, प्रवीण बेरा, ज्ञानेश्वर पारिंगे, भाऊ भगत, हॅप्पी सिंग, प्रितम म्हात्रे, केदार भगत, रूपेश नागवेकर, प्रदीप भगत, राजेश गायकवाड, सुरेश सकपाळ, विठ्ठल मोरे, तेजस जाधव, आदित्य भगत उपस्थित होते. त्यांनीही आमदार रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply