उलवे नोड ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये शनिवारी (दि. 30) विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन शकुंतला ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाला ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, विद्यालयाचे चेअरमन परेश ठाकूर, माजी पं.स. सदस्य रत्नप्रभा घरत तसेच अर्चना ठाकूर, ‘रयत’चे विभागीय निरीक्षक प्रमोद कोंगेरे, पीआरओ बाळासाहेब कारंडे, डॉ. जे.सी. व्यास आदी उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनात पूर्व प्राथमिकपासून माध्यमिकपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि सुंदर प्रतिकृती बनवल्या. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
Check Also
करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …