पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनतेच्या साक्षीने राज्यात आपल्याला अभूतपूर्व असे यश मिळाले आहे. आता पक्षवाढीसाठी आयोजित करण्यात आलेल्या सदस्य नोंदणी अभियानात प्रत्येकाने सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 29) येथे केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने संघटन पर्व 2024 सदस्यता अभियान आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नियोजनाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा बैठक पार पडली. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, आमदार विक्रांत पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस व पनवेल विधानसभा संयोजक नितीन पाटील, जिल्हा सरचिटणीस अॅड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, दीपक बेहेरे, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, ज्येष्ठ नेते सी.सी. भगत, सुनील घरत, वसंत भोईर, चंद्रकांत घरत, रमेश मुंढे, रूपेश धुमाळ, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष उपस्थित होते.
या वेळी रायगड जिल्हा भाजपच्या वतीने जिल्ह्यातील सर्वश्री आमदार प्रशांत ठाकूर, आदिती तटकरे, महेश बालदी, रविशेठ पाटील, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी या महायुतीच्या सातही विजयी उमेदवारांचा तसेच कोकणाचे मार्गदर्शक ठरलेले मंत्री रवींद्र चव्हाण यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे चौथ्यांदा विजयी होऊन रायगडमध्ये इतिहास घडविणारे आमदार प्रशांत ठाकूर तसेच जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पडणारे अविनाश कोळी यांचा या बैठकीत जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी बोलताना सांगितले की, आपले नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने मोठे यश मिळवले आहे. त्याबद्दल सर्व पक्षश्रेष्ठी, महायुतीचे सर्व नवनिर्वाचित आमदार यांचे अभिनंदन करत असून या सर्व विजयात काम करणार्या कार्यकर्त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. विजयानिमित्त केलेल्या सत्काराबद्दलही त्यांनी आभार मानले. आता पक्षाने सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे, ते यशस्वी करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध रहावे, असे त्यांनी सूचित केले.
विधानसभेच्या निवडणुकीतील आपण यश मिळविले. त्यानंतर भाजपनेआता राज्यभर पक्ष सदस्य नोंदणी अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मोबाईलवर मिस्ड कॉल देऊन सदस्यत्व घेता येणार आहे. संघटनात्मक जबाबदारी घेऊन काम करणार्यांना वैयक्तिक कमीत कमी दोनशे प्राथमिक सदस्य करणे आवश्यक आहे. भाजपचे सदस्यत्व मिळवण्यासाठी 8800002024 या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर एक मेसेज प्राप्त होईल, ज्यामध्ये प्राथमिक सदस्यत्व नोंदणी क्रमांक दिला जाईल. राज्यात एक कोटी 51 लाख प्राथमिक सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठेवले आहे. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे या अभियानाचे राष्ट्रीय संयोजक असून प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील प्रदेश संयोजक आहेत. जिल्ह्यात कमीत कमी 10 लाख प्राथमिक सदस्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …