Breaking News

तुफान पावसामुळे केरळमध्ये भूस्खलन; 12 जणांचा मृत्यू

मुन्नार : वृत्तसंस्था
केरळमधील पर्यटनस्थळ मुन्नारजवळ तुफान पावसामुळे भूस्खलन झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 7) सकाळी 11.30च्या सुमारास घडली. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून, 10 जणांची सुटका करण्यात आली आहे. ढिगार्‍याखाली आणखी लोक दबले असल्याने शोध व मदतकार्य सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
भूस्खलन झाल्याने अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफचे पथक पाठविण्यात आले आहे. पोलीस, अग्निशमन दल, वन तसेच महसूल अधिकारी यांनाही बचावकार्यात सहभागी होण्याचा आदेश देण्यात आला आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी भारतीय हवाई दलाची मदत मागितली आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply