Breaking News

भारतीय सैन्याने तयारीत राहावे

जनरल बिपिन रावत यांचे सूचक वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
चीनशी आपल्याकडून धोका असल्याचे बघून पाकिस्तान त्याचा फायदा उचलू शकतो. त्यामुळे कुणी चुकीचे साहस करून आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर आपण जशास तसे उत्तर दिले पाहिजे. त्यासाठी भारतीय सैन्याने तयारीत राहायला हवे, असे सूचक वक्तव्य चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी केले आहे.
चीनशी सुरू असलेल्या वाटाघाटीदरम्यान जनरल बिपिन रावत म्हणाले की, चीन ज्या पद्धतीने रणनीतीनुसार आर्थिक आणि धोरणात्मक मदत पाकिस्तानला करतोय हे पाहता आपल्या लष्कर, नौदल आणि वायूदल या तीनही सेनांनी तयारीत राहावे. रावत यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटले की, जर त्यांनी पूर्व लडाखमधील भारत-चीन वादाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज -लष्कर प्रमुख नरवणे
लडाख ः चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांचा विश्वास दुणावलेला असून, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ते पूर्णपणे सज्ज आहेत, असे भारताचे लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी चीनला उद्देशून म्हटले आहे. नरवणे हे लेह-लडाखच्या दोन दिवसीय दौर्‍यावर असून, एएनआय वृत्तसंस्थेशी बातचीत करताना भारताने आपली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमेवर पर्याप्त सैन्य तैनात केले असल्याचे त्यांनी सांगितले.
लष्कर प्रमुख नरवणे यांनी पुन्हा यावर जोर दिला की, एलएसीवर तैनात केलेल्या लष्कराच्या जवानांचे मनोबल खूपच उंचावलेले आहे. ते म्हणाले, आपले जवान खूप प्रेरित झाले आहेत. त्यांचे मनोबल उंचावले आहे आणि ते समोर उद्भवणार्‍या कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीचा सामना करण्यास तयार आहेत. आमचे अधिकारी आणि जवान हे जगातील सर्वांत हुशार आहेत आणि त्याचा सैन्यच नव्हे; तर देशाला अभिमान आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply