Breaking News

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, जिल्हा सचिव मोहन तोडे तसेच नितळस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदू भोपी यांनी मंगळवारी (दि. 19) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
पनवेलचा विकास करण्यासाठी सदैव तत्पर असलेले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, जिल्हा सचिव मोहन तोंडे, कामोठे शहर उपाध्यक्ष प्रकाश जाधव, सरचिटणीस संजय कदम, सुरेष कुरणे, म्हातारदेव आरोळे, राहुल गमरे, सुरेश आबोडे, अशोक जाधव, दत्ताराम देवाळे, रामदास सोनावणे, महादेव पोळ, नाना साबळे, संभाजी कदम, संपत मोरे, किशोर त्रिवेदी, राजकूमार ठाकूर, आबा गायकवाड, राधा ठाकूर, निता रॉय, मिना पांचाळ, दिपाली तांबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे नितळसचे माजी सरपंच नंदू भोपी यांनीही विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले आहे.
या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, के.के. म्हात्रे, माजी नगरसेवक विकास घरत, भाऊ भगत, धर्मा बुवा यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply