पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. या अनुषंगाने पोदी नंबर 2, भुजबळ माळ आणि पिल्लेज कॉलेजजवळ शनिवारी गरजूंना तसेच रिक्षाचालकांना रविवारी धान्यवाटप करण्यात आले. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिळे, समीर मोरे, आनंद भुजबळ, विजय भुजबळ, पंकज अष्टीकर, पराग कराळे, गनेश कावले, हरेश भुजबळ, हरी भुजबळ, नितीन भुजबळ, गणेश नायक, परेश कापसे, विशाल सावंत, प्रकाश घोडेकर, विनोद सकपाल, राहुल जकाते, दिगंबर साठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …