Breaking News

बंजारा समाजाच्या स्नेहमेळाव्यात आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
महायुती सरकारने बंजारा समाजाला योग्य सन्मान दिला आहे. त्यामुळे जिते बंजाराचा सन्मान तिथे बंजाराचे मतदान असे सांगून या निवडणुकीत बंजारा समाज आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठिशी आहे, असे प्रतिपादन पोहरादेवी धर्मपिठाधीधर महंते जितेंद्र महाराज यांनी रविवारी (दि.17) केले.
संत सेवालाल महाराज लमाण आणि बंजारा तांडा समृद्धी योजने अंतर्गत आयोजित बंजारा स्हेनमेळावा कळंबोलीमध्ये रविवारी झाला. या मेळाव्याला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि मित्रपक्ष महयुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी महंते जितेंद्र महाराज यांनी सांगीतले की, महायुती सरसकारने त्यांच्या कार्यकाळात बंजारा समाजाला योग्य सन्मान दिला. त्यामुळे समाज महायुती आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी खंबीर आहे. त्यामुळे तुम्ही भरघोस मतांनी निवडून याल अश्या शुभेच्छ दिल्या.
या स्नेहमेळाव्याला भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, अमर पाटील, राजू शर्मा, भाजपनेते बबन बारगजे, अमर ठाकूर आदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply