पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच असून खांदा कॉलनीतील ‘उबाठा’च्या पदाधिकार्यांनी सोमवारी (दि. 18) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले.
पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास होत आहे. त्यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन खांदा कॉलनीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख पुंडलिक म्हात्रे, मंगेश पवार, उपशाखा प्रमुख प्रशांत पवार आणि कार्यकर्ते चेतन पवार यांनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले.
या पक्षप्रवेशावेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, भाजप नेते सदानंद पाटील, भीमराव पवार, मोतीलाल कोळी, लतीफ खान आदी उपस्थित होते.
Check Also
पनवेल महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचा दहावा वर्धापन दिन गुरुवारी (दि. १) उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने …
RamPrahar – The Panvel Daily Paper