पनवेल : रामप्रहर वृत्त
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. तत्पूर्वी पनवेल मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा, मुर्बी, खारघर, बेलपाडा आणि कोपरा येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत प्रचार केला. विकासचक्र पुढेही चालू राहण्यासाठी महायुतीची सत्ता आणा आणि कमळ चिन्हासमोरील बटण दाबून मला विजयी करा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
या वेळी माजी नगरसेवक हरेश केणी, पापा पटेल, अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका अलका भगत, भाजप तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, युवा मोर्चा खारघर शहर अध्यक्ष नितेश पाटील, सेक्टर 40चे अध्यक्ष मुनाफ पटेल, सेक्टर 39चे अध्यक्ष शफी पटेल, जफर मुल्ला, जवाद पटेल, जगदीश ठाकूर, संतोष शर्मा, महेंद्र कावळे, परेश पाटील, गुरूनाथ दुंद्रेकर, मीनानाथ भगत, रमेश भगत, राजू पाटील, कांताराम म्हात्रे, रमेश हुद्दार, तुळशीदास पाटील, दीपक पाटील, कृष्णा भोईर, रमेश भगत, मच्छिंद्र कावळे, अनिकेत भोईर, नितेश पाटील, आदर्श पाटील, शुभ पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार प्रचार केला.
Check Also
टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …