Breaking News

भिंगारीमधील शेकाप, मनसे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त
शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का बसला असून भिंगारी मधील अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि.18) भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला यासर्व प्रवेश कर्त्यांचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या प्रवेश कर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले.
दरम्यान, आमदार प्रशांत ठाकूर यांनीही या प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांचा विश्वास सार्थ करणार असल्याची ग्वाही दिली.
पनवेलचा विकसासाठी कटीबद्ध असलेले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यामतून अनेक विकासाची कामे मतदार संघात झाली असून त्यांच्या सक्षम नेतृत्वखाली पनवेल विकासाच्या दिशेना वाटचाल करत आहेत. त्यांच्या या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन भिंगारीमधील शेतकरी कामगार पक्षाचे रोहित शिवकर, रोहित पावणे, प्रीतम पावणे तसेच मनसेचे विजय पवार, गणेश पवार, सुमित मढवी, सौरभ पवार, निखिल पवार, रणजित पवार, श्रावण पवार, यश गावडे, मोहन भोईर यांनी भाजपचे विकसाचे कमळ हाती घेतले.
या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, पनवेल महापालिकचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, स्वप्नील ठाकूर, रूपेश परदेशी, जगदीश परदेशी, पंकज डावलेकर, सुरेश परदेशी आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply