पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल मतदारसंघाचे विकासपुरुष आमदार प्रशांत ठाकूर यांचा विजयाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्व ताकद पणाला लावून संपूर्ण मतदारसंघात प्रचार केला.
या अंतर्गत पनवेल विधानसभा मतदारसंघातील कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, पनवेल, खारघर, नेरे, पाली देवद जिल्हा परिषद, कोन, पळस्पे, विचुंबे पंचायत समिती विभागात भव्य बाईक रॅली रविवारी (दि.17)काढण्यात आली होती. बाईक हजारो कार्यकर्त्यांनी सहभागी होत भाजपचा झेंडा फडकावून आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.
या बाईक रॅलीमध्ये भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शिवसनेचे पनवेल जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्त अमित जाधव, राजेंद्र पाटील, प्रल्हादे केणी, भूपेंद्र पाटील, विचुंबेचे सरपंच प्रमोद भिंगारकर, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, किशोर सुरते, योगेश लहाने, बळीराम पाटील, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक हरेश केणी, विकास घरत, विजय चिपळेकर, डॉ. अरुणकुमार भगत, अमर पाटील, बबन मुकादम, गोपिनाथ भगत, राजू शर्मा, युवा नेते हॅप्पी सिंग, दिनेश खानावकर, महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, साउथ इंडियन सेल्सचे सुजित पुजारी, कामोठे मंडळ सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, शिवशेना शहराध्यक्ष सुनील गोवारी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष किशोर मुंडे, सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, राजेश गायकर, युवा मोर्चा तालुका सरचिटीस विश्वजीत पाटील, कामोठे शहर अध्यक्ष तेजस जाधव, मयूर मोहिते आदी उपस्थित होते.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …