Breaking News

रक्तवाढीसाठी घरगुती उपाय

आरोग्य प्रहर

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे आदी अ‍ॅनिमियाची लक्षणे दिसून येतात. ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांना जास्त त्रास देते. अ‍ॅनिमियाच्या रुग्णांत विटॅमिन बी, लोह तत्त्व, फोलिक अ‍ॅसिडचे प्रमाण कमी होते. अनुवांशिक कारणामुळेही हा रोग होऊ शकतो. शरीरात रक्ताची कमी असेल तर आहारावर विशेष लक्ष द्यावे.

* एक लिंबू ग्लासभर पाण्यात पिळून त्यात एक चमचा मध मिसळून प्या. या उपायाने रक्तवाढ लवकर होते.

* सोयाबीनमध्ये विटॅमिन व आयर्नचे प्रमाण जास्त असते. सोयाबीन उकडून तुम्ही खाऊ शकता.

* थोडेसे सेंधव मीठ व थोडी मिरी पावडर डाळिंबाच्या ज्यूसमध्ये मिक्स करून पिण्यामुळे शरीरातील आयर्नची कमतरता भरून निघते.

* गुळासोबत शेंगदाणे खाण्यामुळेही शरीरातील आयर्न वाढते.

* अ‍ॅनिमियाच्या आजारात पालक औषधासारखे काम करते. पालकमध्ये विटॅमिन ए, सी, बी 9, आयर्न, फायबर व कॅल्शियम अधिक प्रमाणात असते. पालक एका वेळेस 20 टक्क्यांपर्यंत आयर्न वाढवतो.

* रक्त वाढवण्याचा घरगुती उपाय म्हणून तुम्ही टोमॅटे वापरू शकता. ताबडतोब रक्तवाढीसाठी टोमेटॉचा रस प्यावा.

* बॉडीतील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मक्याचे दाणे खाणे फायदेशीर होईल.

* थोडेसे मध एक ग्लास बिटाच्या रसात मिक्स करून पिण्यामुळे शरीराला आयर्न अधिक प्रमाणात मिळते.

* थोडेसे मीठ लसणात मिक्स करून चटणी बनवा. ही चटणी खाण्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल.

* रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी दूध व खजूर खाणे उत्तम उपाय आहे.

* सफरचंदाच्या ज्यूसमध्ये एक ग्लास बिटाचा रस व चवीनुसार मध मिक्स करा. यात लोहतत्त्व अधिक असते.

* पिकलेल्या आंब्याचा गर दुधासोबत घेतल्यासही रक्तवाढ होते.

* पालक, राई, हिरवे वाटाणे, मेथी, कोथिंबीर, पुदिना आपल्या भोजनात समाविष्ट करा.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply