Breaking News

राहुल गांधी यांच्याकडून हाथरस घटनेचे राजकारण

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हाथरस गँगरेप प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रसारमाध्यमांना परवानगी देण्यात आली आहे, मात्र राजकीय व्यक्तींना परवानगी दिलेली नाही. असे असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी शनिवारी (दि. 3) पुन्हा हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी हे केवळ राजकारण करतात, अशी टीका केली आहे.
केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री असलेल्या स्मृती इराणी यांनी वाराणसीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्या म्हणाल्या की, राहुल गांधी हे नेहमी राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, मात्र देशाच्या नीतीमध्ये नरेंद्र मोदी सफल होतात. मला वाटते की देशाची जनता काँग्रेसचे हे प्रकार ओळखते. कोणताही नेता कोणत्याही विषयात राजकारण करू इच्छित असेल तर मी त्याला रोखू शकत नाही. लोकांना माहिती आहे, हाथरसला जाणे त्यांच्या राजकारणासाठी आहे. पीडितेला न्याय देण्यासाठी नाही.
मला मर्यादा असल्याने मी कोणत्याही राज्यातील प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, पण मी मुख्यमंत्र्यांसोबत बोलले आहे. त्यांनी एसआयटी बनविली आहे. एसपींविरोधात कारवाई झाली आहे. एसआयटीचा अहवाल येऊ दे. त्यानंतर ज्या लोकांनी हस्तक्षेप केला किंवा पीडितेला न्याय देण्यामध्ये बाधा आणली त्यांच्याविरोधात योगी कडक कारवाई करतील, असे इराणी म्हणाल्या. राहुल गांधी यांनी गहलोत सरकारलाही फोन करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply